STORYMIRROR

Monali Kirane

Comedy

2  

Monali Kirane

Comedy

विळा-भोपळा

विळा-भोपळा

1 min
37

देव बनवतो बसल्या बसल्या अगदी विजोड जोड्या,

करून ठेवतो बिनकामाच्या उगिचच्या काड्या.

गरीब सोशिक सूनेला संकेश्वरी सासू, 

 देते घशात ठसका नी सतत डोळ्यात आसू.

कामसू सुग्रण सासू ओढते सूनेचाही गाडा,

सून उंडारते दिवसभर सासूला रामरगाडा.

तू-मी करीत काहीजणी बनतातही'आपण',

समजूतदार नात्यांची शक्यच असते गुंफण!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy