विकास
विकास
जीवनी आळस असा
चोरपावलांनी येतो-
अंगी आणि मनी
घर करून बसतो।।
कंटाळा कामाचा येतो
अन गतीही मंदते-
बंधन वेळेचे नाही
कामचुकारी वाढते।।
आजचे उद्या करूया
चालढकलही होते-
मानवास परी असे
करण्यास आवडते।।
कटू सत्य असे जरी
घातक हा आयुष्यास-
क्रियाशील राहूनच
होईल आता "विकास"।।
चंचळपणा अंगात
तोचि प्रगती साधतो-
झटकुनी मरगळ
मार्ग यशाचा चालतो।।