... वीरसैनिक...
... वीरसैनिक...
लपेटून तिरंग्यात
आला देह शहिदांचा
कोटी कोटी सलाम वीरपुत्रांना
गौरव असती देशाचा....
रक्षणासाठी देशाच्या
लावती प्राणपणाला
मान देशाची उंचावण्या
सज्ज सदैव बलिदानाला...
झाले चाळीसजण शहीद
पुलवामाच्या हल्ल्यात
रडला सारा भारत देश
मिटवा सारा आतंकवाद...
वीरपत्नी ती सैनिकांची
आटवते अश्रू नयनात
उद्याचा सैनिक पाहते ती
आपल्या बाळाच्या रूपात...
वीरसैनिकांचे कुटुंब
ढाळत नाहीत अश्रू
श्रद्धांजली करती अर्पित
देती निरोप नयन साश्रू...
