वीर संभाजी (पोवाडा)
वीर संभाजी (पोवाडा)
राजा शिवाजीच्या पोटी
जन्मला पुत्र संभाजी
जी... जी.... रं... जी... हां....
शूरवीर तो पराक्रमी
नाही कसलीही कमी
देतो विश्वासाची हमी
त्याला रयतेची काळजी.....
राजा शिवाजीच्या पोटी
पुत्र जन्मला संभाजी
जी... जी.... रं.... जी... हां....
दिल्लीपर्यंत केले राज्य
वाढवले मराठा साम्राज्य
त्याला जातीभेद त्याज्य
असा होतो तो राजा जी.....
राजा शिवाजीच्या पोटी
पुत्र जन्मला संभाजी
जी... जी.... रं.... जी.... हां....
औरंगजेबाची कापली मान
वाढवली मराठ्यांची शान
मुकुटात रोवले मानाचे पान
माखली तलवार रक्ताने ताजी.....
राजा शिवाजीच्या पोटी
पुत्र जन्मला संभाजी
जी... जी.... रं.... जी... हां....
ग्रंथ लिहिला बुधभूषण
थांबवले जनतेचे शोषण
संभाजी मराठ्यांचे भूषण
शाहिर गातो त्याचे गुणगान जी
राजा शिवाजीच्या पोटी
पुत्र जन्मला संभाजी
जी... जी.... रं.... जी... हां....