वीर हुतात्मे
वीर हुतात्मे
बलिदान दिले तु
देशासाठी क्रांतीवीरा
हुत्मामे तुमचे
देशभक्तीचा झरा
प्राण घेतले हाती
निर्भय निधडी छाती
अभिवादनास्तव गातो
आज तुमची आरती
प्राणाहुनी प्रिय तुुम्हा
आपुली भारतमाता
ऊर दाटतो अभिमानाने
जयगान तुमचे गाता
एकच तुम्हा होता ध्यास
स्वातंत्र्याची होती आस
आचंद्रसुर्य दरवळेल
तुमच्या किर्तीचा सुवास
देह होता फासावरती
तरी मन तुमचे देशावरती
भगवद्गीतेच्या कर्मयोगाची
तुम्ही दिली प्रचिती
तहान भूक विसरून
ध्येयासाठी झपाटून
स्वातंत्र्याच्या होमकुंंडात
घेतले स्वतःस पेटवून
ओठी तुमच्या होता
वंंदेमातरम चा वेदमंंत्र
जयघोष तुुमच्या नावाचा
घुमतो वीरहो जगी सर्वत्र
देशभक्तानो करतो तुुम्हा
कोटी कोटी प्रणाम
आठवणीने तुमच्या
माळा अश्रुंच्या ओघळती
श्वासात स्मरते
शौर्य तुमचे अफाट
हुत्मात्यातून तुमच्या उगवली
स्वातंत्र्याची सोनेरी पहाट
