वीण दोघातली ही तुटेना
वीण दोघातली ही तुटेना
तू मिळणार नाही हे कळतं
गुंतलेले मन सावरता सावरेना..!
डोळ्यात अश्रू, ओठांवर हास्य
माझिया सुनुला प्रीत कळेना..!!
सदा तुझ्या आठवणीत मन रमतं
रात्रीही डोळ्याला डोळा लागेना..!
किती सांगू तगमग मनाची
माझ्या वेदना तुला दिसता दिसेना..!!
तरीही मन तुझ्या वाटेवर थांबतं
थिजलेला श्वासही निघता निघेना..!
कासावीस व्याकूळ जीव नेहमी
वीण दोघातली ही तुटेना..!!

