STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

4  

Rohit Khamkar

Tragedy

विदूषक

विदूषक

1 min
414

लहानपणी त्याला पाहून हसताना, वाटायच आपणही विदूषक व्हाव.

सगळ विष पचवून उरी, रहायचा उभा ते नव्हते ठाव.


अशी भुरळ पडायचा जगाची, समोर आला की एकदाचा.

पडदा पडला की, कोणालाच माहीत नसे पत्ता त्याचा.



तो जगायचा जगवायचा की, जगण्यासाठी करायचा.

कारने सगळीच शोभत होती, असा विदूषकच तो वठवायचा.



विचार नव्हता केला, त्याचाही परिवार असेल तोही एक माणूस असेल.

घाई करणाऱ्या त्या जिवाची धडपड, मुद्दाम चुकी केली तर लोकांचे हसू मिळेल.



तरी तो शांत, शेवटपर्यंत खेळ रंगवायचा.

पडदा पडला तरी, गर्दी पांगे पर्यन्त सगळ पहायचा.



नव्या दिवसाला आण नव्या खेळाला, सगळा थकवा विसरून तयार रहायचा.

स्वतःचा चेहरा लपवून, हसवण्यामागे आनंद मिळवायचा.



आता विदूषक म्हातारा झालाय, त्यच्या नकलाला कोण हसत नाही.

आजही पडदा पडला की, पांगती गर्दी विदूषक त्याच नजरेने पाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy