विद्रोह माणसाचा-कविता
विद्रोह माणसाचा-कविता
माणसातील माणूस जाती जातीत वाटला
जातीभेदाचा कलंक अजूनही कसा का पुसेना?
माणूस माणसासाठी सवेंदनाहीन का झाला?
अन्याय, अत्याचार त्याला कसे का दिसेना?
इथे माणूस माणसाने जाती जातीत बाटला
माणूस म्हणून जगण्याचे त्याला हक्क का मिळना
आपसा आपसातच स्वतःला श्रेष्ठ समजू लागला
जातीभेदाची साखळी अजूनही तुटता तुटेना
जागोजागी गुन्हेगार कसे मोकाट सुटले
आवर त्यांना कुणी कसा का घालेना? 
;
बळाच्या जोरावर मुडदे गरीबांचे पडले
डोळ्यादेखत अत्याचार, त्यांना कुणी का मारेना?
माणूस जातीच्या बेडीत कायमचा अडकला
जातीच्या त्या विळख्यातून तो कसा का सुटेना?
स्वार्थाच्या लालचेने मतभेदात विखुरला
जगण्याचे हक्क त्याला कसे का कळेना?
माणूस माणूसपण आता हरवून बसला
कोणी कुणाच्या रक्षणाला का पुढे सरसावेना?
गोरगरीबांस कोणी आता वाली नाही उरला
भीती गुंडांची हो त्यांना दाद मागता येईना