STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

4  

Bharati Sawant

Romance

विडा

विडा

1 min
673

आलं पावनं माडीवर घेते हातामध्ये पानपुडा

लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||धृ||


धवलशुभ्र चूना कातरली मी सुपारी

कात टाकला वरून चव लईच भारी

गुलकंद मिसळते रस गिळा हळू थोडा

लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||१||


मागवली इलायची दूर विलायतेहूनी

घातली सुगंधी केवड्याची ती फणी

नशा चढंल इष्काची सुपारी दातानं फोडा

लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||२||


केला साजशृंगार बसते खेटून तुम्हाजवळी

तुम्ही बाजिंदे मी तुमची लाडाची पवळी

घाला अंगात तुम्ही लग्नाचा लालजोडा

लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||३||


गुलछबू राया तुम्हीच माझे गुलजार

मला भेटण्या सोडलं तुम्ही सारं घरदार 

रंग प्रीतीचा चढलाय नका घालू आता खोडा

लाल व्हटात रस मिसळा बनविते मी विडा||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance