विचारभ्रमंती
विचारभ्रमंती
बसले होते शांत, गच्च डोळे मिटून
विचार माञ धावत होते, अगदी बेभान होऊन
विचारांना नसते कधीच काळाची मर्यादा
कधी डोकावतात भूतकाळात,
तर कधी सतावते उगाच भविष्या पलीकडिल चिंता
दोन काळातले अंतर, पार करतात ते क्षणार्धात
न जाणो किती चेहरे आठवले, आता थोड्याशाच हया वेळात
कुठून तरी पलीकडूनअचानक मला गाणी ऐकू आली,
आणि लगेचच माझ्या विचारांनी त्यांची दिशा बदलली
हसू आले मला, विचारांचा हा वेग पाहून
अयशस्वी प्रयत्न ही केला, म्हटले बघू तरी जरा हयांना थांबवून

