वहिनीचे जाणे
वहिनीचे जाणे
माझा लाडका लहाना भाऊ
आहे मोठ्या दुःखात
माझी लाडकी वहिनी बाई
गेली डाव सोडून अर्ध्यात
दिवस होता आनंदाचा
संक्रांतीसारखा सण
अशा दिवशी आले
तिला अहेवपणी मरण
अचानकच घडलं सारं
घाव बसला हृदयात
कशी करावी त्याने
आपल्या दुःखावर मात
गौरव माझा भाचा
होता दहावीला
अचानक आईचा अंत
सराव परीक्षेच्या
पहिल्याच पेपरला
एसएससीच्या रिझल्टला
83 टक्के पडले त्याला
थोडीशी शांती कदाचित
मिळाले असेल तिच्या आत्म्याला
अशाच दु:खी मनस्थितीत
रक्षाबंधनाचा आला सण
काय बोलू कसे समजावू
अजुनी दुःखी आमचे मन
माझी राखी त्याच्या हाती
वहिनी बाई बांधीत होती
आता त्याच्या हाती
कोण बांधेल ती
देवा कोणाच्या घरी
नको देऊ अशी परिस्थिती