STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

3  

Prashant Kadam

Romance

व्हॅलेंटाईन !

व्हॅलेंटाईन !

1 min
615


१४ फेब्रुवारीस येतोय

व्हॅलेंटाईन दारी

प्रेमी युगुलांचा

सण लय भारी


निखळ प्रेमाच्या

देतील आणा भाका

गुलाबी प्रणयाचा

घेतील उंच झोका


गुलाब पुष्प

करतील अर्पण

नजरे मध्ये

पाहतील दर्पण


आनंदात होवून

रममाण

परस्परांचे गातील

गुणगान


प्रेमाचा हळुहळु

चढू लागेल पारा

एकांतात घालवतील

मग वेळ सारा


एकच दिवस जणू

असे प्रेमाचा

तसा करतील साजरा

सण वर्षाचा






साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance