STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Inspirational

3  

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Inspirational

वेळ पुरत नाही...

वेळ पुरत नाही...

1 min
146

नियोजन आमचं चुकतं, दोष कोना द्यावी.

सगळं शेवटी संपत आलं, की वाटतं वेळ पुरत नाही.

काय बोलू अन काय सांगू, डोकं असं शांत होई.

आठवून सगळी कामे, डोळ्या समोर अंधार येई.

आटपण्याच्या घाईत सारं, वेळ निघून जाई.

सगळं शेवटी संपत आलं, की वाटतं वेळ पुरत नाही.

मध्येच असे वाटते, आता सुधरत नाही होईल काई.

नातीही तेव्हा रुसतात, आई बाबा दादा अन ताई.

पण त्यांची साथ कायम आहे, सारे माझी आई.

सगळं शेवटी संपत आलं, की वाटतं वेळ पुरत नाही.

प्रवासात आयुष्याच्या, संकटाचे गाणे गाई.

टप्पा शेवटचा काय, माझ्या नशिबी ठाई.

वाससा विना तारमळतात, गोठ्यातील गाई.

सगळं शेवटी संपत आलं, की वाटतं वेळ पुरत नाही.

कित्येक गोष्टी नंतर, तश्याच मनात राही.

आशेचा तो प्रत्येक क्षण, त्याच दिशेला वाही.

तरीही उरतात की हो, क्षण चांगले काही.

सगळं शेवटी संपत आलं, की वाटतं वेळ पुरत नाही.

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy