STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

वेदनेत विव्हळतांना तुझ्या ...

वेदनेत विव्हळतांना तुझ्या ...

1 min
230

वेदनेत विव्हळतांना तुझ्या ,

आठवांचा तोल जातो ,

डोळ्यांतुन मग गळतांना ,

भावनांचा डोह खोल जातो ...


उमलावी कळी मनाची अन ,

पाकळी पाकळी फुल व्हावी ,

वयात येता गंधाळतात जेव्हा ,

फुलपाखरांचा तोल जातो ...


डवरले फुलांचे झाड भारां ने ,

फांदया खाली झुकू लागल्या ,

स्पर्श ना व्हावा मातीचा झालास ,

तर जिवनांचा मोल जातो ...


किती दिवस तो पारिजात ,

बहरून विसावेल फांदीवरी ,

येते रात बहराची चंद्र उधाणलेला ,

अन् मनाला बोल जातो ...


एक मंद वाऱ्याचा झोत आला ,

उभा पारिजात कोलमडला ,

सांडली फुले अंगणी काही गजऱ्यात ,

काही चरणी व काहींना ओल जातो ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract