STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

वड...!

वड...!

1 min
763


(वड)


ओळखा पाहू 

ओळखा पाहू

म्हणून

साधं घातलं कोड...


चार चार ओळींची

माळ गुंफून

गुंतून ठेवलं

आपण थोडं...


अडल नाही

आमच कोठेच घोडं

पाहून तुमचं

हक्क फुलक कोड...


मनात म्हंटले

ऑक्सिजन देते पहा झाड

मग कोडे सुटण्यास

नाही उरला पाड...


दाढीवाले ऋषी

त्यांच्या संगे खेळती मुले

सांगती आनंदाने

आजोबांचे नाते....


आधार घराचा

वयस्क मंडळी

जाणतात ना

आज कालचीही मुले...


पटकन सुटले पहा

आपले कोडे

झाडाखाली बसून

खाता गरम गरम वडे ...


उत्तर कसले पहा

सुंदर सुचले

वडा खाली बसुनी

खाता खाता वडा....


पशुपक्षी अन 

मानव प्राणी

वडा जवळी फोडती

गुपितांचा चौघडा....


आराध्य वृक्ष तो

सुवासिनींना भावतो

आधाराची सावली सर्वांना

हाच वृक्ष जो वड आपल्याला देतो...


सांगा सांगा सुटले की नाही 

कोडे पहा क्षणार्धात

वड च आपला तो

प्रणाहून प्रिय हो अर्थात....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational