STORYMIRROR

Subhash Charude

Romance

2  

Subhash Charude

Romance

वचन

वचन

1 min
13.6K


तुझ्या स्मृती मनी दाटता

पाणावती लोचन

परमपितात्याला साक्षी ठेऊन

देतो तुला वचन

सत्व परिक्षा नकोस घेऊ

तु माझ्यासाठी खास

जीव गुंतला तुझ्यामध्ये

तु माझा आहे श्वास

चार दिसांचे जीवन आपले

नकोस देऊ त्रास

ह्दय मंदिरी माझ्या ग

तुझाच आहे वास

जन्म घेतला माझ्यासाठी

हेच तुला सांगणे

जन्मोजन्मी साथ मिळो

हेच एक मागणे

देह मी अन प्राण तू

हेच तुला सांगतो

जन्मोजन्मी साथ दे

हेच तुला मागतो

जन्मोजन्मी साथीचे

देतो तुला मी वचन

तुझ्या स्मृती मनी दाटता

पाणावती लोचन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance