वैकुंठ गमन
वैकुंठ गमन
फाल्गुन द्वितिया|तिथी आहे खास
जे झाले विशेष |नांदुरकीला ॥१॥
संत श्री तुकोबा |किर्तन करिती
उपदेश देती |तळमळीने ॥२॥
मुढ जना तारी| सन्मार्ग दाखवी
अमृत चाखवी |भक्तांना खास ॥३॥
दिसो नये जना | ऐसे करी देवा
विनवी केशवा. | कळवळीने ॥४॥
किर्तन रंगात. |भक्तजन दंग
आळवी अभंग. | मनापासून ॥५॥
करुनी उच्चार | त्रिवार ते सत्य
नाही मुळी मिथ्य|तारते नाम ॥६॥
जातो आम्ही गांवा|राम राम घ्यावा
दया करी देवा | विनवी तुका ॥७॥
ऐसे आळवून|बसती विमानी
केले तुकोबांनी|आज गमन ॥८॥