वाटतं स्वतःला मुक्त करावं
वाटतं स्वतःला मुक्त करावं
कधी कधी वाटतं एकदाच मरून जावं
सतत होणाऱ्या या फेरफटीपासून स्वतःला मुक्त कराव.
न बोलता सर्व समजून घेणारे आता बोलूनही समजत नाही
डोळ्यातल्या त्या अश्रूंना बघूनही त्यांना पाझर फुटत नाही
कोण चुक कोण बरोबर आता याची वेळ निघून गेली
जगायचं म्हणून जगते आता मी स्वतःला विसरून गेली
