||वाट वृष्टी ची ||
||वाट वृष्टी ची ||
तो चातक झाला आतुर
आकाशी आहे त्याची नजर ||
नभी शोधतो आहे जलद||
पहिला जलबिंदू पिणार तो अलगद ||
धरणीलाही लागली मिलनाची आस
कधी भिजवेल तिला हा पाऊस ||
चातक तो दृढ निश्चयी
कुठलेच पाणी तो न घेई ||
मेघ अवकाशी तो शोधत असे
मेघराज जलधारा घेऊन बरसे ||
वसुंधरेला लागली चाहूल
कधी पडेल पावसाचे पहीले पाऊल ||
जणू तप्त निखारे अंगावर
सोडत असे तो भास्कर ||
वाट बघत आहे सारी सृष्टी
कधी होणार वर्षा वृष्टी ||