वास्तव मी जगताना
वास्तव मी जगताना
वास्तव मी जगताना
होतात खूप अवहेलना
जिवन असले सुखाचे
त्यातील वेदना सहवेना
असनाही म्हटले तरी
करावे आपले कर्तव्य पार
आयुष्य असे आनंदिच
न समजावे पापाचा भार
सत्कर्म करून घ्यावी
सज्जनांची पुण्याई
पदरी पडते तीच
केलेल्या कर्माची परछाई
देऊन सर्वांना संघर्षाचे बळ
पुण्य प्राप्त करावे सकळ
ठेवावे लागते मन प्रबळ
प्रारब्ध होईल सफल
