वारी
वारी
विठ्ठलाची आस
लागलीय मना
नाही भेट घडली
काहूर माजले जी
कसा जाईल दिस
तुझ्या दर्शना विना
मनी निवांतपणा
नाही थोडा
आठवे मला
वारीचा तो गजर
अखंड हरीनाम
विसरून देहभान
माऊली तुझ्या दारी
नाही कोण सान थोर
पायी अनवाणी
ना कशाची फिकीर
मातीचं हे शरीर
जाईल मातीत मिळून
मागणे एकच आता
व्हावा परिसस्पर्श तुझा
नाही मी नामा
नाही मी जनी
माऊली माझ्या ध्यानीमनी
सदा तूच
माझे विठू माऊली
जाणतो तू सारे
काय हा विध्वंस
जाहला जी
नको देवा तू
पाहू आता अंत
वाचाव मानवजात
या कोरोनातून
इडा, पीडा टळू दे
सुख शांती मिळू दे
आनंदी आनंद होऊ दे
थांबावं संहार विठुराया
चूक भूल, माफी करा
पुढल्या वारीला
करीन जी सेवा
दान हे देवा, देवावे जी
