वार्धक्य अभंग
वार्धक्य अभंग
तारुण्याची धुंदी || वार्धक्याच्या गाथा ||
आहे परिकथा || स्वप्नातल्या ||
तारुण्य पोळले || काळजीत सारे ||
होताच म्हातारे || सुख मिळे ||
नाती संगे खेळा || नातू मागे चेंडू ||
आनंदाने भांडू || आजोबांना ||
पहाटेचा चहा || सणा पुरणपोळी ||
बीपी ची रे गोळी || सुना देती ||
राजापरी झोपे || तो दिवाणावर ||
पाहे दिनभर || सोनी टीव्ही ||
खाणे आणि झोप || दोनच रे काम ||
खिशातही दाम || सदाकाळी ||
सोबत मुलांच्या || जगावे तारुण्य ||
नको रे कारुण्य || डोळ्यांमध्ये
सोन्या परी मुले || फुलां परी मुली ||
भाग्य माझे खोली || वार्धक्यात ||
मुलांनी आणली || सुखाची पहाट ||
अमूल्य ही भेट || निसर्गाची ||
पंकज म्हणे रे || म्हातारपणाला ||
सुवर्ण घडीला || आनंदी व्हा ||
