वारा
वारा
वारा सुटला गार गार
मनाला आनंद झाला फार फार
मनाने तो अलगच आनंद अनुभवला
वारा जोरात आभाळाला जावून भिडला
हळूच काना मांगुन येवून स्पर्श केला
कानाला स्पर्श होताच अंगावर शहारा आला.....
वारा खूपच लागत आहे थंड
कान केले मी हळूच बंद
वारा जसा जसा वाहत होता
मन माझ त्याच्या तालावर नाचत होत
मला बघून जणू झाडही हासत होती
वाऱ्यावर झाड ही मान हलवत होती...
आजचा वारा मला जरा
अलगच वाटत होता
जणू तो कोणाला तरी भेटणार होता
वारा सुटला आणखी जोरात
म्हणून मी गेले माझ्या घरात
जणू उडून जाईल मी त्याच्या भवऱ्यात......
झाले वातावरण चहूकडे मंद
जणू फुलामधून येत होता गंध
पक्षी सुध्दा गाणी गावू लागली
गाणी ऐकून झाडही नाचु लागली
नाच बघून ढगही हसू लागली
हसू बघून वाराही वाहू लागला
