STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

वाळुचे घर

वाळुचे घर

1 min
381

आठवणीत तुझ्या हृदयाची सांज रंगते आहे,

छंद तुझा लागला मनाला कागदावर कोरते आहे ...


ओलचिंब झालेले मन रुसते त्या आभाळावर,

बेभान बरसणाऱ्या सरींसवें मनात उरते आहे ...


गाज ती सागराची इंद्रधनूही ऐकून लाजते ,

मोहरलेल्या त्या क्षणासवे किनारे झूलते आहे ...


पाचूच्या बनात मिळून वाळूचे घर बांधले ,

लाट सागराची घेऊन चालली डोळे पाहते आहे ...


आज रंगली ही सायंकाळ त्याच लाल रंगात पण,

शहारे निजलेले भासही सुर्यामागे लपते आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance