वाईट दिवस आलेत
वाईट दिवस आलेत


कोरोना.. कोरोना.. कोरोना..
लोक फारच भयभीत झालेत,
खरच या जगावर साऱ्याच
किती वाईट दिवस आलेत..
लाँकडाऊन, क्वारंटाईन सॅनिटायझर ,मास्क,
शाळा, माॅल, हाॅटेल, रस्ते बंद
बंद झाला श्वास,
बाहेर निघायची हिंमतच नाही
घरात सारेच कंटाळून गेलेत..
मास्क लावायचं, वाफ घ्यायचं
घरातच राहायचं, हात धुवायचं
बंदी, मंदी, बेरोजगारीत
कसं जगायचं, काय खायचं?
आकडे सारे लाखात गेलेत
कोरोनानं कित्येक मेलेत..
बंद रेल्वे, विमान बंद
बंद वाहतूक, व्यापार
खूप घेतंय खबरदारी
सांगतंय खूप सरकार
सारेच धंदे बंद झाले
लोक अन्नाला मोताद झालेत..
कोरोनानं सारेच भयभीत झालेत
अन् खरंच वाईट दिवस आलेत..