STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Children

4  

Ashok Shivram Veer

Children

वाहनांची सभा...

वाहनांची सभा...

1 min
316

भरली होती अशी वाहनांची सभा,

भलामोठा ट्रक होता मधोमध उभा.


डस्टर ही आली झटकून डस्ट,

ग्लोस्टर म्हणे मी सांगते गोष्ट.


कार लागे वाजवू भोंगा ट्वाई ट्वाई,

रिक्षाला पुढे जाण्याची नेहमीच घाई.


व्हॅन म्हणे मला जाऊ दे ना,

नॅनो म्हणे मला भी येऊ दे ना.


हुंडाई अशी कशी मधी घुसते,

लेलंड साऱ्यांची वाट बघत बसते.


मारुती म्हणे चला चला चला,

तवेरा म्हणे नको बाबा मला.


टॅम्पो दरडावी कशाला आला,

जिप्सी सांगे जाऊ द्या त्याला.


इनोव्हाला मिळेना जायला रस्ता,

बस मात्र अशी खातेय खस्ता.


ऐकेना येथे कोणीच कोणाचे,

करु लागे खरे हरएक स्वतःचे.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Children