STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy Inspirational

3  

VINAYAK PATIL

Tragedy Inspirational

वादळ

वादळ

1 min
232

बोल एकदा वादळा त्या उध्वस्त घराशी 

उडून गेलेल्या छपराशी 

कोलमडून पडलेल्या भिंतीशी 

जमीनदोस्त झालेल्या त्या वास्तूशी 


समजून घेशील का त्या वेदना 

अख्खा संसार वार्‍यावर पडला 

खचलेल्या त्या कुटुंबाने कसा करावा सामना 

सांग वादळा सारा डाव तुझ्यासमोर मांडला 


तुझ्यामुळे झाले कित्येक बेघर अन अनाथ 

क्षणात मोडला डाव बिथरले सारे भाव 

कोण होईल या अनाथांचा नाथ 

या प्रश्नाचे उत्तर तुझ आहे का ठाव 


नक्कीच हा निसर्गाचा प्रकोप असावा 

ज्याने दाखवून दिली आपली महती 

चेतावनी तू समजून घे मानवा 

आपण या पृथ्वीतलावरचे पाहुणे असती 


वेळीच आवर घाल तुझ्या कर्मांवर 

याचे प्रताप बघितले तू तुझ्या डोळ्यांनी 

तयारी ठेव येणाऱ्या वादळांवर  

नाही तर होशील नेस्तनाबूत चारी बाजूंनी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy