वादळ भेट
वादळ भेट
गालगा-गालगा-गालगा-गालगा
वादळा सारखे भेटुनी चालली
काळजाला कशी भेदुनी चालली
चांदणी चंद्रमाला कशी भेटली
राज हृदयातले खोलुनी चालली
मोगरा सारखा पाहता हासली
नेत्र हे भेटता लाजुनी चालली
रात्र ही वाढता चांदणी तेजली
प्रेम रंगात ती रंगुनी चालली
चांदणी रात ही काळजा भावली
चंदना सारखी गंधुनी चालली
मी न माझा अता राहिलो कामिनी
स्पंदने आतली चोरुनी चालली
संपला विरह हा आपला साजणी
प्रेम वर्षाव ती झेलुनी चालली
पावसाळा कसा वाळवंटात हा
पावसाला इथे आणुनी चालली
ओहळा सारखी आसवे वाहली
ती मला का पुन्हा सोडुनी चालली

