वाढदिवस
वाढदिवस
लाभले हे भाग्य बाई, माझ्या जीवनाला.
कुबेराचे धन मज हे, मातृत्व लाभ झाला.।।ध्रु।।
आनंद गगनात मावेना मावेना.
शिवबा, संभाजी स्मरत ठेवले, नाव शौर्यशील.
किर्तीवंत होत हो तू, समाजात कार्यशील.
आशिर्वाद तुला सदैव, यशाचं शिखर चढशील.....।।१।।
संकटे किती ही आले डगमगू नको रे.
तव किर्तीचा अभिमान मिरवू नको रे.
स्वप्न साकारण्यास त्यास बळ दे रे देवा.
तुझा वरद हस्त ठेव, करून घे रे सेवा.....।।२।।
तुझा वाढदिवसाठी नक्षत्रांचे आसमंत उतरला.
उदंड आयुष्य लाभो गाणे गात तुजला.
उज्ज्वल भविष्याचे पंख घेत तू बहरला.
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध मनामनात पसरला.....।।३।।
