वाद
वाद
कोर्टाच्या पायरी शहाण्या माणसांनी चढू नये म्हणतात
तरिही वाद मिटविण्यासाठी नको ते आवुर्जून करतात
मुळात वाद करण्यासारखे व्यवहार असतातच कशाला
कृतीपेक्षा बोलण्यात वेळ घालवतात कशाला
वादात सहनशक्तीपेक्षा आकलनशक्ती वाढवली पहिजे
समजविण्यापेक्षा समजण्याकडे भर दिला पाहिजे
ठरलीच असेल एखादी गोष्ट मनापासून तर ठाम रहा
वायफळ बोलण्यात व धमकविण्यापासून सतत दुर रहा
कारण वादात फक्त वेळ व ऊर्जा वाया जाते
समस्या सोडवता येत नाही उलट ती वाढत जाते
ओरडून रागावून प्रश्न सोडवता येतो का कधी?
थोडे शांत राहुन वेळ देण्याची गोष्ट आहे ही साधी
छोटसंच पण सुंदर आयुष्य माणसाच असत
चुकिच्या गोष्टीत ते वाया घालवायाच नसतं
चांगल्या गोष्टी करता आल्या तर करु काही
कारण हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणे नाही
