ऊठा ऊठा रे पेटून..
ऊठा ऊठा रे पेटून..
ऊठा, ऊठा रे सारे पेटून
ऊठा दंड सारे ठोकून..
आता समाज पेटला
दंड थोपटून उठला,
प्रश्न साराच मिटला
मार्ग खरा भेटला...
ऊठा, ऊठा रे शपथ घेऊन..
अण्णा, लहुजी,फकीराची शिकवण...
चला जागे व्हा आता
करा कार्य नको बाता,
नाही कोणी आपला त्राता
हवी फक्त एकता...
पहा इतिहास तो आठवून
ऊठा, ऊठा रे सारे पेटून...
लढा आहे अस्तित्वाचा
न्याय, हक्क, स्वाभिमानाचा,
नको विलंब क्षणाचा
करा निर्धार मनाचा...
गट,तट सारे भेद सोडून
हाती पिवळे निशाण घेऊन.
आता सोडा ती लाचारी
आहे वेळ हीच खरी,
एकजुटीने द्या ललकारी
लढाई आहे हीच खरी
गाजवायचे आझाद मैदान
जय अण्णा,जय लहुजी बोलून..
गायकवाड आर.जी.दापकेकर
९८३४२९८३१५
