STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

ऊठ, जागा हो..

ऊठ, जागा हो..

1 min
467

तुझ्या हाती आहे बाळा

भविष्य या देशाचं,

चल ऊठ, जागा हो

बरी नाही झोप...


देशद्रोहींचा आहे

करावयाचा नायनाट,

देशामध्ये च देशाचे

दुश्मन हे खूप...


समता, बंधुता ही

आहे धोक्यात,

पेटवून देश दुश्मन

आगीत टाकतो तूप...


देशविघातक कारस्थान

करतो रोज पाक-चिन,

डागायची आहे आता

त्यांच्यावर तोफ...


दारिद्रय, बेकारी, महागाई

घोटाळे नी भ्रष्टाचार,

करायचा नायनाट

नाही होणार आपोआप...

 

देशाची किर्ती महान

देशासाठी अर्पण प्राण,

महासत्ता व्हावा भारत

करावं हे काम सोपं...


स्वप्न देशाच्या विकासाचे

तुला आहे साकारायचे

ऊठ,हो जागा बाळा

सोड आळस, झोप...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational