उठ लेकरा नको मागू भीक
उठ लेकरा नको मागू भीक
उठ उठ लेकरा
नको मागू भीक
पाटी-पेन्सिल घे,
जा शाळेमध्ये शिक
नको भीक मागू ,
भर पोटामध्ये काट
पण नको सोडू ,
धर शिक्षणाची वाट
शिक्षणाने बदल ,
तुझ्या लल्लाटीची रेखा
दे सोडून साऱ्या गोष्टी
नको करू लेखाजोखा
सरकार देतय तुला
सार फुकटचं
पाटी , दप्तर, गणवेश
आणि जेवण दुपारचं
घे याचा फायदा
घे निर्णय तु नेक
उठ उठ लेकरा
नको मागू भीक
एका तागडीत ठेवली
दौलत साऱ्या जगाची
दुसऱ्या तागड्यात ठेवली
ज्ञाननगंगा पुस्तकाची
जड होईल पारड्ये,
ज्यात ज्ञानगंगा वाहे
ज्ञानाचा हा दीप
अखंड तेवत आहे
ज्ञानाच्या प्रकाशात
तू स्वतःला जोख
नाहीतर मग तुला
खावं लागेल ईख
पाटी-पेन्सिल घे
जा शाळेमध्ये शिक
उठ उठ लेकरा
नको मागू भीक