STORYMIRROR

Meera Mahendrakar

Classics Others

4  

Meera Mahendrakar

Classics Others

उत्सवाचा सण

उत्सवाचा सण

1 min
275

दिवाळी आली दिवाळी आली 

आनंदाची जणू पहाट झाली


रंगीत लाईटचा झगमगाट नुसता सगळीकडे 

तेल वात लेवुनी मातीची पणती चहूकडे 


सुंदर फुलांचे तोरण दारी

 रंगीत रांगोळी सुबक अंगणी


 आई आजीने प्रेमाने केलेला फराळ मस्त 

लहानग्या मुलांचा गुपचूप होतो लाडू फस्त


साज शृंगार शालू भरजरी नवा 

नवीन कपड्यांबरोबर सुगंधी अत्तर हवा 


लक्ष्मीपूजनाची तयारी जय्यत सारी 

उत्सवाची दिवाळी ही अनोखी आणि न्यारी 


माहेरवाशीणी येतात करून सुखद प्रवास 

 भेटीगाठीच्या ओढीने भरून जातो निवास 


आपुलकीचा गोडवा जपला जातो मनात

 सुख व समृद्धी लाभते या दिवाळी सणात


आठ दहा दिवस चालतो हा उत्सव रंगात 

गोडवा वाढवणारा सण दिवाळीखेरीज नाही कश्यात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics