उर्जा स्थळ
उर्जा स्थळ
1 min
278
सागर देतो उर्जा जगण्याची
ताकद लाटांमध्ये धूपण्याची
निःशब्द होते मन शांततेने
मंथन अंतरी निवांततेने
अस्थिर जीवन वास्तव कळे
खळबळ गाज किनारी वळे
रंगला खेळ सारा पुळणीला
शंख शिंपले गोळा माळणीला