STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

उणीव

उणीव

1 min
403


दादा तुम्ही गेल्यावर

कळलं तुमचं महत्व

त्या रुबाबदार शैलीत

खरं काय होतं सत्व ।।

नाही कधी समजून घेतलं

तुमच्या चिडचिड पणाला

आज त्याच वाईट वाटतं

दादा आमच्या मनाला  ।।

दादा तुम्ही जीवनात

फार मोठा संघर्ष केला

म्हणून आज तुमचा

परिवार सुखी झाला ।।

मला बी वाटतं दादा

तुमच्या जवळ बसावं

मनातलं सुख दु:ख

सारच काही पुसावं ।।

सर्व काही विसरतं पण

विसरत नाही जाणीव

सुख सगळं असूनही

भासते तुमची उणीव ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy