STORYMIRROR

SWATI WAKTE

Tragedy

5.0  

SWATI WAKTE

Tragedy

उन्हाळा

उन्हाळा

1 min
1.3K


जीव झाला कासावीस

उन्हाचा हा दाह

पक्षी झाले व्याकुळ

पाण्याचा त्यांना सुटे मोह


अंगाची होय लाहीलाही

सूर्य ओकतो हा आग

प्राणी शोधती सावली

नाही लागे कुठे थांग


उन्हाने देह होई बेजार

चढला सूर्याचा पारा

मानव होती बेभान

शोधती थंड वारा


जीवाची ही का घालमेल

असा कसा हा उन्हाळा

त्याला कारण मानवच

कधी येईल पावसाळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy