उंदीर मामा
उंदीर मामा
इटुकले पिटुकले
होते उंदीर दोन
हॅलो हॅलो करायला
घेतला फोन....!!
मेजवानीचा बेत
सांगायचा फोनवर
जस्ट रिडायल केला
पटकन दोनवर....!!
मनीमाऊ झाली
तयार पार्टीसाठी
धावतपळत निघाले
चुकन पडल्या गाठी...!!
मनीपाऊला पाहून
उंदीरमामा गेले घाबरून
पळता भुई थोडी झाली
गेले पार हादरून....!!
काय करावे सुचेना
बीळ कोठे दिसेना
मनीमाऊ भुकेली
हसता कांहीं हसेना...!!
तेवढ्यात आला हत्ती
खुलली उंदीरमामाची बत्ती
चटकन चढले हत्तीवर
मनीमाऊ राहिली खालती...!!
मनीमाऊचा डाव फसला
उंदीर निघाले खुशीत
इटुकले पिटुकले उंदीर दोन
फिरवला हात मिशीत...!!
हत्तीदादाचे आभार मानत
हळूच बिळात शिरले
मनीमाऊ रागाने लाल
हाती काही ना उरले....!!
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
उंदीरमामा खुश झाले
पुन्हा कधी पार्टी नको
हसून हसून म्हणाले.....!
