उमाजी नाईक(अष्टाक्षरी काव्य)
उमाजी नाईक(अष्टाक्षरी काव्य)
लक्ष्मीबाई दादोजीच्या
घरी उमाजी जन्मला,
बहिणींचा पाठीराखा
भाऊ रक्षक बनला.
असे निधड्या छातीचा
बाणा आणिक करारी,
शोधुनिया दमलेले
इंग्रजांचे अधिकारी
खंडोबाच्या चरणाशी
असे घेत लोटांगण,
जेजुरीच्या गडावर
मिळे उमाजीला मान
भांडाऱ्याचा मळवट
गळा शोभेतो ताईत,
इंग्रजांन
ा तंगवले
हेरगिरि पटाईत
दांडपट्टा तलवार
भाला कुऱ्हाड गोफन,
घेऊनिया उमाजीन
केली देशाची राखण
राजे उमाजी नाईक
नव्हती परवा जीवाची,
आद्य क्रांति कारक हा
दिली आहुती प्राणाची
स्वराज्याच्या सुपुत्राची
ठेवूनिया आठवण,
करू साजरी जयंती
आहे गर्व अभिमान