उलटलं फासं
उलटलं फासं
तुरुतुरु दुडूदुडू आवाज
मोठा झाला
खुळखुळ्यांचा फुग्यांचा आकार
छोटा झाला
साबणाचे फुगे आता
दिसत नाहीत
कडेला बसलेल्या आजी
ओळखत नाहीत
जायचा यायचा रस्ता
एकच होता
आता मात्र तोच
अतिक्रमणात गेलता
लपाछपीची जागा पण
बदलली गेली
कारण सर्वांच्या लपण्यात
फसवणूक आली
जग जरा कळलं
आत्ता कुठंसं
नेल त्यानं बालपण
उलटलं फासं
