उद्वेग
उद्वेग
सत्तेच्या ठेकेदारांनी गद्दार नेत्यांनी
खुर्चीत बसलेल्या अंधभकतानी
वाट लावलीय देशाची
निरर्थक मुददयानी पुलवामा,
हिजाब काश्मीर फाईल्स ,
हिंदू मुस्लीम, आरक्षण, भोंगे, ज्ञानवापी,
ताजमहाल नी आता अग्निपथ
ही षडयंत्रे कशासाठी?
कोणाच्या इशाऱ्यावर
कुणाच्या फायद्यासाठी
पेट्रोल गॅसचे दर, शेतकरयांचे कर्ज,
समान शिक्षणाचा हक्क,बेरोजगार युवक,
महीलांचे शोषन,कष्टकऱ्यांची पिळवणुक
अन्न वस्त्र निवारा सर्वधर्मसमभावाची जपणुक
हे सर्वसामान्य जनतेचे
लोकशाही देशातील हक्क
वंचितांच्या हककांना पायदळी
तुडवुन जातीयतेची रोपटयां
खतपाणी घालुन गुलामगिरीच्या खाईत लोटण्यासाठी?
