उद्वेग मनाचा
उद्वेग मनाचा


स्वार्थी अवघे जग हे सारे
स्वार्थी सारी नाती-गोती
भावनेचा लवलेश नाही
फसवी इथे रक्ताची नाती
निसर्गाचा कोप झाला
जग झाले बंदीस्त
राहिली भेट आमची अधुरी
नेत्रही भिजले आठवणीत
झाला मनाचा उद्वेग
भासे सारेच मृगजळ
आस आहे मनाला ज्याची
समजे ना त्यासी प्रीत प्रांजळ
विरह हा माझ्या मनास जाळी
आठवणी त्याच्या छळत राही
सोनेरी दिवस ते विरुनी गेले
स्मरूनी ते क्षण अश्रू अनावर झाले