STORYMIRROR

Prashant Kadam

Classics

2  

Prashant Kadam

Classics

उदे ग अंबाबाई !!

उदे ग अंबाबाई !!

1 min
685

ऊदे , ऊदे , ऊदे 

ऊदे ग अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी

आलो तूझीया दारी

घेऊनी आलो तूझ्याच साठी

चार पायांचा बळी

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


आई भवानी तूझ्याच साठी

मांड मांडीला घरी

घेऊनी आलो तूझ्याच साठी

ओटी साडी चोळी

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


आई भवानी तूझ्याच साठी

चूल सजवली नवी

घेऊनी आलो तूझ्याच साठी 

प्रसाद तक्षण करूनी

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


आई भवानी तूझ्याच साठी

दिवट्या अन् मशाली

घेऊन आलो तूझ्याच साठी

पिंजर गुलाल भाळी

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


आई भवानी तूझ्याच साठी

जागर जागविला

घेऊनी आलो तूझ्याच साठी 

गोंधळी अन् वाजंत्री

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


आई भवानी तूझ्याच साठी

गोंधळ हा घातला

आशिर्वाद दे आमच्या साठी

ऐश्वर्य सूखाचा

ऊदे, ऊदे, ऊदे

ऊदे ग अंबा बाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics