त्यागमूर्ती रमाई
त्यागमूर्ती रमाई
भिडली काळजात माता रमाईची हाक|
झिजली आम्हासाठी मी दुःख मानतो शोक||
हरपले प्राण तुझे पेटले हे रान|
रमाई तुझं जाणं आम्ही झालो आणवान||
भिमाचा आधार माता रमाई सावली|
जीवाचं रान दीन दलितांची माऊली||
रमा होती साधी भोळी भिमरायांची लाडकी|
जीव घेरला काळाने आम्ही झालो पोरकी||
आसू कोसळले भिमाचे दु:ख पसरले आभाळाएवढे|
त्यागमूर्ती माता रमाई दिसते डोळ्यापुढे||