त्याची सावली
त्याची सावली
मोठ्ठ होत झाड ते ,अंगणात उभ बाहू पसरून
चार पिढ्या गेल्या आमच्या तरी थकल नाही ते अजुन
गर्द हिरवी पानं त्याची ,दाट होती किती
घरटी त्यावर पक्षांची मी होती मोजली
कोकिळ काळा गात होता मधुर त्याच्याच फांदीवरती
पोपटांची पोपट पन्छीं रोजच दोन्ही वेळी
कावळ्यांची भरते शाळा ,
चिमण्यानंचाही असतो गोंधळ
गातो येऊन सुभग ऐका त्याच्या फांदिवर
नाचराही येतो मग शिट्टी फुक्कंत ति मधुर
सुर्यपक्ष्याचे रंग सुंदर ,मोरपिशी उन्हात कोमल
वाटसरूचां होतो निवारा ,प्राण्यांनचाही हा सहारा
दाट ,विस्तिर्ण ,पर्ण पसारा देतो दाट सावली
त्याच्या आस-याशी येणा-या प्रत्येकाला
