त्या वळणावर पाऊस होता
त्या वळणावर पाऊस होता
जेव्हा मी वळून पाहिले
तू पाठमोरा उभा होता
काही बंधन नाही राहिले
असंच वदवून गेला होता
अश्रूंनी साथ सोडून दिली
मनात अंधार दाटला होता
शब्दांची पोटली रीती जाहली
निर्णय तुझा झाला होता
काळ्या ढगांनी केली गर्दी
वादळ वारा वाहत होता
त्याक्षणी उतरली प्रेमाची धुंदी
निसर्ग धडा शिकवत होता
दुःखात तुझ्या शामिल मीही
हेच आवर्जून सांगत होता
नको माघारी फिरुस कधीही
संदेश मोलाचा देत होता
प्रीत माझी गेला विसरून
धागा नात्याचा कमकुवत होता
केली नवीन सुरुवात जिथून
त्या वळणावर पाऊस होता

