STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Tragedy Fantasy

3  

Rutuja kulkarni

Romance Tragedy Fantasy

त्या वाटेवर

त्या वाटेवर

1 min
181

त्या वाटेवर तुला पाहिले मी

अन क्षणांत निःशब्द मन झाले

विचारांत गुंतले ते स्तब्ध नयन

अन अधीर आता अबोल झाले


त्या वाटेवर तुला पाहिले मी

तशी आठवणींना पुन्हा जाग आली

फुंकर मारलेल्या त्या जुन्या जखमांवर

पुन्हा आज नवी जखम झाली


त्या वाटेवर तुला पाहिले मी

अन सावरलेली मी पुन्हा हरवले

प्रेम नाही येत सहज विसरता

हे मला पुन्हा एकदा जाणवले. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance