STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract

3  

Author Sangieta Devkar

Abstract

तूच ना? मर्द?

तूच ना? मर्द?

1 min
292

मुलगा हवा वंशाला म्हणुन स्त्री भ्रूण हत्या करवनारा..तुच ना ? मर्द ..

बायको च्या मागे मागे करणारा,मुलगा म्हणुन लाड़ात वाढलेला......

वृद्धाप काळी आई वडिलांना एकट सोडनारा... तुच ना? मर्द..

पुरुषी अहंकार बाळगनारा,प्रसंगी बायकोला कमी लेखनारा........

दुसऱ्या बाई वर नजर ठेवनारा...तुच ना? मर्द..

वासनेनी डबडबलेली तुझी नजर ...

चुकवत ती रस्त्याने जाणारी,

काही अघटित नाही ना घड़नार ही भीती निर्माण करणारा....तुच ना ? मर्द..

नवरात्रीत नऊ दिवस देविचा उपवास करणारा,

आणि घरच्या लक्ष्मीवर हात उचलनारा....तुच ना? मर्द..

मुलींना पूर्ण पोशाख घालन्याचे ज्ञान देणारा तू,तु

झी नग्न मानसिकता ना सांभाळु शकनारा ...तुच ना? मर्द...

शिव जयंती ला राजेंचा जयघोष करत फिरनारा,

तिने नकार दिला तर भररसत्यात तिच्या वर ऍसिड फेकनारा .... तुच ना ? मर्द...

सव्हताच्या कलंकित चरित्राचा गुणगान करणारा,

लग्ना साठि मात्र वर्जिन मूलगी शोधनारा ...तुच ना? मर्द...

ज्या आई बहिणी वरुन शिव्या देणारा,

नको विसरु तू ही त्यांच बाई च्या गर्भातुन जन्माला आला...तुच ना ? मर्द...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract