तूच माझं सर्वस्व
तूच माझं सर्वस्व
हरिणीसारखे नयन तुझे
नजर चुंबक गौर काया
तूच माझं सर्वस्व
तुझ्याविना जीवन वाया || 0 ||
जन्ममरण तुझ्यासोबत
तुझ्यासोबत हसणं रडणं
प्रत्येक जन्मी जीव माझा
केवळ तुझ्यासोबत जडणं
तुझ्यासाठी जगणे तूच
जिवनाची मोहमाया
तूच माझं सर्वस्व
तुझ्याविना जीवन वाया || 1 ||
प्रत्येक जन्माची नाळ
एकमेका जोडली आहे
विरहाची कल्पनाच
निसर्गाने खोडली आहे
तप्त दुःखाच्या उन्हात
तूच शीतल थंड छाया
तूच माझं सर्वस्व
तुझ्याविना जीवन वाया || 2 ||

