तू
तू
अंगणातली पवित्र तुळस तू
देवाच्या मंदिराचा कळस तू
जग निर्मितीचे कारण तू
सगळ्या संकटांचे तारण तू
दुसऱ्यासाठी झिजणारं चंदन तू
हळूवार मनाचं अलगद स्पंदन तू
नात्यांमधील भावनांच गुंफण तू
मनातल्या दुःखाला लिंपण तू
झगमगत्या दिव्याची ज्योत तू
मायेच्या तलम पदराचा पोत तू
स्वतःला सिद्ध करणारी मानिनी तू
स्वतःच अस्तित्व जपणारी कामिनी तू
प्रसंगी कठोर रणरागीनी तू
सर्वांना तृप्त करणारी अन्नपूर्णा तू
सर्वांचे जीवन उजळवणारी समई तू
आसमंतात गुंजणारी सनई तू
दुसऱ्यासाठी झिजणारी माऊली तू
दुःखात सुखाची शीतल सावली तू ....
